भरधाव कार उलटली; सुदैवाने चालक बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 18:24 IST2020-04-20T18:20:24+5:302020-04-20T18:24:06+5:30
दर्यापूरकडून मूर्तिजापूरकडे जात असलेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली

भरधाव कार उलटली; सुदैवाने चालक बचावला
मूर्तिजापूर : दर्यापूरकडून मूर्तिजापूरकडे जात असलेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. ही घटना २० एप्रिल रोजी सिरसो गावाजवळ घडली. रस्त्याच्या कडेला १० फूट खड्ड्यातून ही कार शेतात पडली. कारमधील एअर बॅगमुळे चालक बचावला.
कार क्रमांक एमएच ३० ए झेड ८६६३ मूर्तिजापूरकडे भरधाव येत असताना अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला तयार झालेल्या दहा फूट खड्ड्यातून गटांगळ्या खात २०० फूट एका शेतात जाऊन उलटली. शेजारील शेतात काम करीत असलेल्या दोघांनी कार सरळ करून चालकाला बाहेर काढले. अपघात होताच कारमध्ये असलेल्या एअर बॅग बाहेर आल्याने कार चालक बचावला. या अपघातात कारचा चुराडा झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (शहर प्रतिनिधी)