नागपूरहून शेगावला जाणाऱ्या कारचा अपघात; एक ठार, पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 20:29 IST2020-10-12T20:28:08+5:302020-10-12T20:29:16+5:30
Car accident, National Highway, Akola या अपघातात कारचालक योगेश गायधानी (४०) याचा जागीच मृत्यू झाला.

नागपूरहून शेगावला जाणाऱ्या कारचा अपघात; एक ठार, पाच जखमी
पारस: राष्ट्रीय मार्गावर कान्हेरी फाटयानजीक भाविकांच्या झालेल्या कारच्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, १२ आॅक्टोबर रोजी पाहटेच्या सुमारास घडली. या अपघात कारमधील इतर पाच जखमी झाले आहेत. हे सर्व जण नागपूरहून शेगाव येथे देवदर्शनासाठी जात होते.
नागपूरहून शेगाव येथे काही भाविक कार क्रमांक एम.एच. ४९ बी.६५७७ या कारने जात होते. राष्ट्रीय माहामार्गावरील कान्हेरी गवळी फाट््यानजीक कारचालकाचे डोळे लागल्याने त्याचे कारवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला घसरली. हा अपघात एवढा भीषण होता की, कार जवळपास ४०० फूट घासत गेली. या अपघातात कारचालक योगेश गायधानी (४०) याचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर पाच भाविक जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी भरती करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठीत घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी दिनेश निकम यांच्या फियार्दीवरून कारचालकाविरुद्ध कलम २६९, ३३७, ३०४ अ भादविच्या सहकलम १४८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .