कारची समोरासमोर धडक, तीन गंभीर जखमी; पिंजर ते बार्शिटाकळी रस्त्यावरील घटना
By रवी दामोदर | Updated: June 18, 2023 17:16 IST2023-06-18T17:15:53+5:302023-06-18T17:16:08+5:30
पिंजर ते बार्शीटाकळी मार्गावर असलेल्या एका पेट्रोलपंपनजीक दोन कारांची समोरासमोर धडक झाली.

कारची समोरासमोर धडक, तीन गंभीर जखमी; पिंजर ते बार्शिटाकळी रस्त्यावरील घटना
अकोला : पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असेलल्या पिंजर ते बार्शीटाकळी मार्गावर दोन कारांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १७ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने जखमींना रुग्णवाहिकेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
पिंजर ते बार्शीटाकळी मार्गावर असलेल्या एका पेट्रोलपंपनजीक दोन कारांची समोरासमोर धडक झाली. ही बाब पेट्रोलपंपचे मालक पवनकुमार जयस्वाल यांना समजताच त्यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच प्रमुख दिपक सदाफळे यांच्या संपर्क साधून अपघाताची माहीती दिली. माहिती मिळताच दिपक सदाफळे यांनी सहकारी मयुर सळेदार, अंकुश सदाफळे, सुरज ठाकुर, महेश वानखडे, अमित ठाकूर, ज्ञानेश्वर वेरुळकार यांच्यासह घटनास्थळ गाठले. त्यानंतर तत्काळ तीनही जखमींना उपचारासाठी दाखल केले. अपघातात सय्यद नूर (वय २४), अब्दुल उममार (वय २५) (दोघेही रा. अकोट फैल, अकोला) तर गणेश रामभाऊ लहामगे (२०), मयुर मधुकर मेसरे (वय ३१) (दोघे रा. पिंजर) जखमी झाले आहेत. त्यापैकी एक किरकोळ जखमी असल्याची माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दिली.