अकोला ते पातूर रस्त्यावर भरधाव कार उलटली, युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 18:45 IST2019-05-11T18:44:25+5:302019-05-11T18:45:47+5:30
पातूर (अकोला): भरधाव कार उलटल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना ११ मे रोजी सकाळी पातूर ते अकोला रस्त्यावर नांदखेड फाट्याजवळ घडली.

अकोला ते पातूर रस्त्यावर भरधाव कार उलटली, युवक ठार
पातूर (अकोला): भरधाव कार उलटल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना ११ मे रोजी सकाळी पातूर ते अकोला रस्त्यावर नांदखेड फाट्याजवळ घडली. अनंता श्रीधर गव्हाणकर रा. तापडीया नगर अकोला असे मृतक युवकाचे नाव आहे.
अनंता गव्हाणकर हे कार क्र.एमएच ३१ डीव्ही ६०३८ ने अकोला ते पातूर रस्त्याने जात होते. दरम्यान, नांदखेड फाट्यावर केबल करीता खोदलेल्या नालीवरून ही कार उलटली. तसेच रस्त्याच्या बाजुला जाउन उलटली. यामध्ये अनंता श्रीधर गव्हाणकर हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रस्त्याने जाणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सर्वोपचार मध्ये शवविच्छेदनानंतर त्यांचे मुळ गाव निमकर्दा येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनंत गव्हाणकर हे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचे नातेवाईक असल्याचे समजते. याप्रकरणी पातुर पोलिसांकडे वृत्त लिहेपर्यंत कुठल्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. या घटनेमुळे गव्हाकर कुटुंबियांवर शोककळा पसरली. (तालुका प्रतिनिधी)