vidhan sabha 2019 : आजपासून दाखल होणार उमेदवारी अर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 13:40 IST2019-09-27T13:40:14+5:302019-09-27T13:40:23+5:30
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रकिया शुक्रवार, २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

vidhan sabha 2019 : आजपासून दाखल होणार उमेदवारी अर्ज!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात येणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रकिया शुक्रवार, २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरू होणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ आॅक्टोबर असून, शासकीय सुटीचे दिवस वगळता सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.