शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजेंना धर्मवीर म्हणणं म्हणजे; अमोल मिटकरींचं भाजप आमदारांना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 13:58 IST

अजित पवारांचं विधान इतिहासाला धरुन आहे, छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं म्हणजे त्यांच्या उत्तुंग उंचीला मर्यादा आणणं होय.

राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. भाजप आणि शिंदे गट यावरून आक्रमक झाला आहे. अजित पवारांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यातच एका भाजप नेत्याने याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना, अजित पवारांना पाकिस्तानात पाठवून द्यायला हवे, असे म्हटले आहे. आता, राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवारांचे खंदे समर्थक अमोल मिटकरी हेही मैदानात उतरले आहेत. मिटकरी यांनी भाजप आमदारांना थेट चॅलेंजच दिलं आहे.  

अजित पवारांचं विधान इतिहासाला धरुन आहे, छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं म्हणजे त्यांच्या उत्तुंग उंचीला मर्यादा आणणं होय. संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, संभाजी महाराजांनी केवळ हिंदू आणि हिंदू धर्मासाठीच बलिदान केलं असं जर कोणी म्हणत असेल, नवीन जावई शोध लावत असेल तर, भाजपच्या कोणत्याही आमदाराने माझं चॅलेंज स्विकारावं. संभाजीराजे स्वराज्यरक्षक होते की धर्मवीर यासाठी डिबेटमध्ये बसावं. जो कोणी हरेल त्याने पदाचा राजीनामा द्यावा, असं चॅलेंजच आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदारांना दिले आहे. 

शिंदे गटाचे आमदार तेव्हा कुठे बिळात तोंड लपवून बसले होते, जेव्हा सावित्रीमाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल राज्यपाल आणि चंद्रकांत पाटील बोलते होते, असा प्रतिप्रश्नच मिटकरी यांनी केला. वारंवार पक्ष बदलणाऱ्या माणसांनी अजित पवारांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. जो व्यक्ती स्वत:ला धर्मवीर म्हणत असेल त्या व्यक्तीने अजित दादांबद्दल बोलू नये, असे म्हणत आमदार मिटकरी यांनी भाजप आमदारास टोलाही लगावला. 

दरम्यान, भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी अजित पवारांवर टीका केली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहेत. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्यामुळे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. असे बोलण्याचा अधिकार अजित पवार यांना कुणी दिला? अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, असे तुषार भोसले यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाले भाजप आमदार

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्या नेत्याला माहीत नाही ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत धर्म बदलला नाही. औरंगजेबाने त्यांचे हाल केले, त्यांनी धर्मांतर करावे म्हणूनच हाल केले. पण संभाजी महाराजांना धर्माचा अभिमान होता. त्यांनी धर्मासाठी प्राणांची आहुती दिली. धर्माकरीता त्यांना वेदना सहन कराव्या लागल्या. म्हणूनच त्यांना जगात धर्मवीर म्हणून मान्यता आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशी महाराजांची जगात ओळख आहे. अजितदादांनी जे विधान केले, त्याबद्दल खरेतर त्यांची रवानगी पाकिस्तानमध्ये केली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. 

रोहित पवारांचे दिले प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपकडून होत असलेल्या टीकेचा समाचार घेतला. तुम्ही शब्दांशी खेळत बसू नका. त्यामागची भावना समजून घ्या. राज्यपालांनी आणि भाजपच्या प्रवक्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. तेव्हा तुम्ही शांत का होता? अशी विचारणा रोहित पवार यांनी केली. तत्पूर्वी, विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी, आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात नाही. तसेच 'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असेही अजित पवार यांनी म्हटले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAmol Mitkariअमोल मिटकरीBJPभाजपा