शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी; संजय धोत्रे यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 10:40 IST

सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी केंद्रीय कृषिमंत्री ना. नरेंद्र तोमर यांच्या सोबत चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शेतकऱ्यांकडे विक्रीअभावी पडून असलेला जवळपास निम्मा कापूस खरेदी करण्यासाठी शासनाने मुदतवाढ देण्यासोबत प्रतवारीमध्ये बदल व सुधारणा करण्यासंदर्भात सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी केंद्रीय कृषिमंत्री ना. नरेंद्र तोमर यांच्या सोबत चर्चा केली.टाळेबंदीमुळे सर्वच क्षेत्रातील उद्योग, व्यवसाय ठप्प पडले असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा निम्मा कापूस विक्रीअभावी घरात पडून आहे. राज्य शासन व केंद्र सरकार सर्व परीने मदत करण्यास तत्पर आहेत. नुकत्याच सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली असली तरीही ज्या शेतकºयांनी पूर्वी नोंदणी केली आहे त्यांचाच कापूस खरेदी करण्याच्या सूचना आहेत. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू होताच १४ मार्च २०२० पासून खरेदी प्रक्रिया बंद केली आहे. खासगी व्यापारसुद्धा बंद आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला कापसाची विक्री करता आली नाही. सीसीआयकडूनही खरेदीसाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. कापूस खरेदी केंद्रावर सीसीआयने नियुक्त केलेल्या ग्रेडर वर्गाकडून त्रास देण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकºयांकडून प्राप्त होत असल्याच्या मुद्यावर केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी केंद्रीय ना. कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.कापूस ठेवण्यासाठी जागाच नाही! सीसीआयच्या केंद्रांवरून शेतकºयांच्या कापसाच्या गाड्या परत पाठविल्या जात आहेत. आगामी दिवसात शेतीच्या मशागतीला सुरुवात केली जाणार आहे. या धामधुमीत शेतकºयांनी कापूस कसा विकावा, असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित झाला असून, त्यांच्या घरामध्ये कापूस ठेवण्यासाठीसुद्धा जागेचा अभाव असल्याच्या मुद्यावर केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांसोबत चर्चा केली.केंद्र व राज्य शासनाने प्रतवारी निश्चित करावी! कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग आवश्यक असल्याने कापूस यार्डची संख्या वाढविण्यासोबतच ग्रेडरची संख्या वाढविणे गरजेचे झाले आहे. खरेदी केंद्रांवर आणल्या जाणाºया कापसाची प्रतवारी निश्चित करण्यासाठी ‘एफएक्यू’ ही एकच प्रतवारी असून, यामध्ये शासनाने बदल व सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा शेतकºयांचा कापूस खरेदी होणार नाही आणि यामुळे त्यांना आर्थिक खाईत ढकलल्यासारखे होईल, याकडेही ना. संजय धोत्रे यांनी केंद्रीय कृषिमंत्री ना. तोमर यांचे लक्ष वेधले.

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे