शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

हवाला रॅकेटचा पर्दाफाश

By admin | Updated: May 13, 2014 09:35 IST

अशोकराज आंगडिया कुरिअरमधून २८ लाखांची रोकड जप्त; एक जण ताब्यात

 

 

अकोला : जुना कॉटन मार्केटमधील अशोकराज आंगडिया कुरिअर्सद्वारे राज्याच्या विविध भागात हवालाच्या माध्यमातून पाठविण्यात येत असलेली सुमारे २८ लाख रुपयांची रक्कम सोमवारी दुपारी जप्त करण्यात आली. पैशांचा काळाबाजार म्हणून ओळख असलेल्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला. या कारवाईमध्ये एका व्यावसायिकास ताब्यात घेण्यात आले आहे. अशोकराज आंगडिया कुरिअर्सचे संचालक निमेश इंद्रवर्धन ठक्कर (४0) रा. नवरंग सोसायटी यांच्या कुरिअर्सच्या माध्यमातून हवाला रॅकेटची सुमारे २७ लाख ७९ हजार ३५0 रुपयांची रोकड सोमवारी राज्याच्या विविध भागात पाठविण्यात येत होती. या प्रकाराची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांच्या पथकाने जुने कॉटन मार्केटमधील अशोकराज आंगडिया कुरिअर्समध्ये छापा टाकून तब्बल २७ लाख ७९ हजार ३५0 रुपयांची रोकड जप्त केली. यासोबतच ३0 हजार रुपयांचे इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, यामध्ये नोटा मोजण्याचे यंत्र, ४ महागडे मोबाईल, नोटांची पंचिग मशीन, ६ लॅन्डलाईन फोनचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेली २८ लाख रुपयांची हवालाची रक्कम क्रिकेटवरील सट्टाबाजार, कमोडिटीज आणि अनधिकृत व्यवसायाची असल्याची प्राथमिक माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली. जुना कॉटन मार्केटमधील अशोकराज आंगडिया कुरिअर्समधून हवालाची रक्कम पाठविण्यात येणार असल्याची माहिती एका आठवड्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मागील आठवड्यापासून हे पथक आंगडिया कुरिअर्सवर पाळत ठेवून होते. सोमवारी रक्कम राज्याच्या विविध भागात पाठविण्याची तयारी सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून ही रक्कम जप्त केली.

  ■ जुना कॉटन मार्केटमधील अशोकराज आंगडिया कुरिअरचा छापा यशस्वी होताच स्थानिक गुन्हे शाखेने बाजूलाच असलेल्या इंद्रपुरी कुरिअर सर्व्हिसेसमध्ये छापा मारला; मात्र त्यापूर्वीच या कुरिअर सर्व्हिसेसमधील कर्मचारी पळून गेले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंद्रपुरी कुरिअर सर्व्हिसेस कार्यालयाची झाडाझडती घेतली; मात्र त्यांना काहीही आढळून आले नाही.आयकर विभागाच्या परवानगीनंतर तपास■ अशोकराज आंगडिया कुरिअर्समधून जप्त करण्यात आलेल्या २८ लाख रुपयांचा हवाला रकमेचा तपास करण्याची परवानगी आयकर विभागाकडून घेण्यात येणार आहे. आयकर विभागाच्या परवानगीनंतर या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. १८ लाखांची रोखही आढळली■ स्थानिक गुन्हे शाखेने जुना कॉटन मार्केटमधील कुरिअर सर्व्हिसेसमध्ये राबविलेल्या धाडसत्रात एका इन्व्हेस्टमेंटच्या कार्यालयातून १७ लाख ९४ हजार ५९२ रुपयांची रोखही आढळली. अशोकराज आंगडिया कुरिअर सर्व्हिसेस आणि त्यानंतर इंद्रपुरी कुरिअर सर्व्हिसेसच्या छाप्यानंतर पोलिसांनी बाजूलाच असलेल्या शशीकांत इन्व्हेंस्टमेंटमध्येही तपासणी केली. या तपासणीत पोलिसांना १७ लाख ९४ हजार ५९२ रुपयांची आणखी रोखही आढळली. ही रक्कम जप्त करून सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात आणल्यानंतर शशीकांत इन्व्हेंस्टमेंटचे संचालक नवीन गुप्ता यांनी सदर रकमेची रीतसर देयके आणि बँकेच्या सोमवारी करण्यात आलेल्या व्यवहाराच्या पावत्या पोलिसांना दाखविल्या. त्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता ही रक्कम सोमवारीच अकोला अर्बन बँकेच्या मुख्य शाखेतून काढण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी चहूबाजूने तपासणी केल्यानंतर ही १८ लाख रुपयांची रक्कम अधिकृत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुप्ता यांना ही रक्कम परत देण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 'व्हाइट कॉलर' येणार समोर■ स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी जप्त केलेल्या हवाला रॅकेटच्या रकमेचा तपास सखोल केल्यानंतर अनेक व्हाइट कॉलरवाल्यांचे काळे धंदे समोर येणार असल्याची शक्यता पोलिस विभागाने वर्तविली आहे. हवाला रॅकेटची रक्कम पाठविण्याचा काळय़ा बाजारामध्ये शहरातील अनेक बड्या उद्योजक व व्यापार्‍यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्यांच्या चेहर्‍यावरील पडदा लवकरच उठणार असल्याची माहिती आहे.कुरिअर सर्व्हिसेस बंद■ अशोकराज आंगडिया कुरिअरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून रक्कम जप्त करताच इतर बहुतांश कुरिअर सर्व्हिसेची कार्यालये बंद करण्यात आली होती. हवाला रॅकेटचा गोरखधंदा करणार्‍या कुरिअर सर्व्हिसेसच्या संचालकांनी कार्यालये बंद करून त्यांनी सोमवारी दुपारी शहराबाहेर पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशोकराज आंगडियाच्या छाप्यानंतर एलसीबीने विविध कुरिअर सर्व्हिसेसच्या कार्यालयांची तपासणी केली; मात्र बहुतांश कार्यालये बंद होती.