बस-ट्रकची धडक; सहा विद्यार्थ्यांसह ३१ प्रवासी जखमी

By Admin | Updated: August 23, 2014 02:18 IST2014-08-23T00:03:06+5:302014-08-23T02:18:10+5:30

ब्रेक निकामी झाल्याने अपघात : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव मार्गावरील घटना.

Bus-truck hit; 31 pilgrims injured, including six students | बस-ट्रकची धडक; सहा विद्यार्थ्यांसह ३१ प्रवासी जखमी

बस-ट्रकची धडक; सहा विद्यार्थ्यांसह ३१ प्रवासी जखमी

वाशिम : शेगावहून भोकरकडे जाणार्‍या एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बसने धावत्या ट्रकला पाठीमागून जबरदस्त धडक दिली. या धडकेमध्ये बसमधील ३१ प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता मालेगाव मार्गावर घडली. जखमीमध्ये आश्‍विनी कुंडलकर (शिरपूर), नंदाबाई देवळे, भिमराव गुडदे (मालेगाव), स्वप्नील मोरे (मालेगाव), नंदू डुबे (नागरतास ता. मालेगाव), अमोल बोरचाटे (डही ता. मालेगाव), रमेश भामोदकर (शेगाव), पार्वताबाई दिंडोरे (शेगाव), नागोराव मते (नांदेड), धोंडीबा भोकरकर (भोकर), गंगा काळे (मेडशी), पुजा जोगदंड (रिसोड), रन्नो रेगिवाले (शिरपूर जैन ता. मालेगाव), हरिभाऊ कर्‍हाडे (चांडस ता. मालेगाव), संतोष राऊत (चंद्रपूर), संघपाल वानखडे (भेरा), ज्ञानेश्‍वर कुटे (पांगरी कुटे), सुगंधाबाई शिंदे (मालेगाव), मनिष पाठक (लातूर), शेखर बोरीकर (नागपूर), निलय वोरा (अकोला), कृष्णा गवळी (एकांबा), प्रकाश वाघतकर (वाकद ता. रिसोड), नरेंद्र वडाळ (चोहट्टा बाजार), इंदिराबाई भोकरकर (भोकर), समीर बांडे (मालेगाव), कमला हिवराळे (वारा जहाँ. ता. वाशिम), कांताराम गायकवाड (वडप ता. मालेगाव), स्नेहा घुगे (मालेगाव) यांच्यासह ३१ प्रवाशांचा समावेश आहे. सर्व जखमींवर वाशिम येथील जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. काही जखमी खासगी रूग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले होते. त्यांची नावे समजू शकली नाही. वृत्त लिहीस्तोवर वाशिम शहर पोलिसांनी ट्रक चालक पी. दुर्गाराव याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अपघाताप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Bus-truck hit; 31 pilgrims injured, including six students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.