म्हसला पुलावर बस-ट्रकचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2016 02:05 IST2016-06-17T02:05:10+5:302016-06-17T02:05:10+5:30

बस चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले.

Bus accident truck accident | म्हसला पुलावर बस-ट्रकचा अपघात

म्हसला पुलावर बस-ट्रकचा अपघात

सातगाव म्हसला (जि. बुलडाणा): धाड-औरंगाबाद राज्य मार्गावरील म्हसलाजवळील धामणा नदीच्या पुलावर बुलडाणा येथून गंगापूरला जाणारी बस (एम.एच.२0 बीसी २१६0) आणि माहोरा येथून धाडकडे येणारा पाण्याचा ट्रक (एम.एच. २८ बी ७९२२) यांच्यात १६ जून रोजी सायंकाळी समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये एक प्रवासी जखमी झाला. या अपघातात बसचे संतुलन जाऊन ती धामणा नदीच्या पुलावरून खाली कोसळली असती, तर मोठा अनर्थ झाला असता; मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले. अपघाताचे वृत्त कळताच धाड ठाण्याचे सहायक निरीक्षक सोद्मो यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सदर अपघाताचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Bus accident truck accident