अज्ञात इसमाने तीन दुचाक्या जाळल्या!

By Admin | Updated: August 30, 2016 02:11 IST2016-08-30T02:11:51+5:302016-08-30T02:11:51+5:30

अकोल्यातील सातव चौक परिसरातील घटना.

Burned by three unknown lights! | अज्ञात इसमाने तीन दुचाक्या जाळल्या!

अज्ञात इसमाने तीन दुचाक्या जाळल्या!

अकोला , दि. २९: सातव चौक परिसरातील एका घरासमोर उभ्या असलेल्या तीन दुचाक्या व एक सायकल अज्ञात इसमांनी जाळल्याची घटना सोमवारी सकाळी समोर आली. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसात तक्रार केल्याची माहिती आहे.
सातव चौक परिसरात उभ्या असलेल्या तीन दुचाकी व एक सायकल अज्ञात इसमाने रविवारी रात्री पेटवून दिल्या. या तीनही दुचाक्या जळाल्याने यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. पैसे वसुलीच्या कारणावरून ही घटना घडल्याची माहिती आहे. दुचाक्या जाळल्यानंतर सातव चौकातील नागरिकांनी सोमवारी पहाटे या ठिकाणी गर्दी केली होती. मात्र या दुचाक्या नेमक्या का जाळण्यात आल्या याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, कुणीही सायंकाळपर्यंत पोलिसात तक्रार दिली नव्हती.

Web Title: Burned by three unknown lights!