सावरगाव येथे घरफोडी!

By Admin | Updated: June 3, 2017 01:41 IST2017-06-03T01:41:28+5:302017-06-03T01:41:28+5:30

खेट्री: चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथे भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना २ जून रोजीच्या सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Burglary at Savargaon! | सावरगाव येथे घरफोडी!

सावरगाव येथे घरफोडी!

लोकमत न्यूज नेटवर्क
खेट्री: चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथे भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना २ जून रोजीच्या सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सावरगाव येथील सूर्यभान जगदेव चुंदळे हे घराला कुलूप लावून आपल्या शेतात भुईमूग काढण्यासाठी सकाळीच गेले होते. त्यांची पत्नी अकोला लग्नासाठी गेल्या होत्या. घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराच्या भिंतीला लावलेला टिनपत्रा वाकडा करून घरात प्रवेश केला. तसेच घरात कपाटातील ठेवलेली रोकड ३० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. शेतकरी सूर्यभान चुंदळे शेतातून घरी आले असता सदर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत सूर्यभान चुंदळे यानी संध्याकाळी ७ वाजता थेट चान्नी पोलीस स्टेशन गाठले. वृत्त लिहीपर्यंत फिर्याद देणे व कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Burglary at Savargaon!