घरफोडीतील अट्टल चोरटा जेरबंद

By Admin | Updated: July 2, 2017 09:35 IST2017-07-02T09:35:56+5:302017-07-02T09:35:56+5:30

घरफोडी प्र्रकरणातील अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी अटक केली.

Burglary burglar | घरफोडीतील अट्टल चोरटा जेरबंद

घरफोडीतील अट्टल चोरटा जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका घरफोडी प्र्रकरणातील अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याच्याकडून चोरीतील ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत २०१६ मध्ये शेख मुस्तकीन अब्दुल जाहीर कुरेशी रा. मच्छी मार्केट याने एका घरात चोरी करून सोन्याचे ३१ ग्रॅमचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे सदर घरफोडी हे शेख मुस्तकीन अब्दुल जाहीर कुरेशी याने केल्याचे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शनिवारी त्याला अटक केली असून, त्याच्याकडून ३१ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

Web Title: Burglary burglar