हिवरखेड येथे घरफोडी

By Admin | Updated: March 22, 2017 02:41 IST2017-03-22T02:41:48+5:302017-03-22T02:41:48+5:30

७0 हजारांचा ऐवज लंपास

Burglars at Hiverkhed | हिवरखेड येथे घरफोडी

हिवरखेड येथे घरफोडी

हिवरखेड (अकोला), दि. २१- स्थानिक पूर्वा कॉलनीतील एका घरातून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने, रोख असा ७0 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना २१ मार्च रोजी उघडकीस आली. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार बस स्टँडनजीकच्या पूर्वा कॉलनीत राहणारे सुरेश पुंडलीकराव कुर्‍हाडे यांच्या निवासस्थानी घरी कुणी नसताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच लोखंडी कपाटातील सोन्याची पोथ, अंगठी, चांदीचे दागिने व रोख रक्कम १५ हजार असा एकूण ७0 हजारांचा ऐवज लंपास केला. सुरेश कुर्‍हाडे यांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि ३८0, ४५४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे, हवालदार नंदू सुलताने करीत आहेत.

Web Title: Burglars at Hiverkhed