मूर्तिजापुर येथे घरफोडी

By Admin | Updated: November 22, 2014 02:16 IST2014-11-22T01:56:13+5:302014-11-22T02:16:58+5:30

चोरट्यांनी केली ८१ हजार रुपयांची चोरी.

Burglar at Murthijapur | मूर्तिजापुर येथे घरफोडी

मूर्तिजापुर येथे घरफोडी

मूर्तिजापूर: येथील चिखली रोड भागातील शे. नासीर शे. नजीर यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ८१ हजार रुपयांची चोरी केल्याची घटना २0 नोव्हेंबरच्या रात्री घडली. मूर्तिजापूर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शे. नासीर, शेख नजीर हे अकोला येथे वास्तव्यास असून, ११ नोव्हेंबर रोजी त्यांनी बँकेतून ८१ हजार रुपये काढून घरातील कपाटात ठेवले होते. गत काही दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी २0 नोव्हेंबरच्या रात्री घरात प्रवेश केला व कपाटातील ऐवज लंपास केला. चोरीचा छडा लावण्यासाठी अकोला येथून श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले होते; परंतु श्‍वान पथकाला यश आले नाही. शे. नासीर शे. नजीर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम ४५७, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे करीत आहेत.

Web Title: Burglar at Murthijapur