बुलडाण्यातील व्यक्तीचा मूर्तिजापुरात आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 19:02 IST2021-03-20T19:02:36+5:302021-03-20T19:02:50+5:30
Buldana man attempts suicide in Murtijapur प्रकाश मुरलीधर चव्हाण (वय ३६) असे त्या इसमाचे नाव आहे.

बुलडाण्यातील व्यक्तीचा मूर्तिजापुरात आत्महत्येचा प्रयत्न
मूर्तिजापूर : बुलडाणा जिल्ह्य़ातील एक व्यक्ती त्याच्या ७ वर्षीय मुलासोबत मूर्तिजापूरात आला. त्याने येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरसो फाट्यावर शनिवारी दुपारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रकाश मुरलीधर चव्हाण (वय ३६) असे त्या इसमाचे नाव आहे.
बुलढाणा जिल्ह्य़ातील टूनकी ता. संग्रामपूर येथील ३२ वर्षीय व्यक्ती मूर्तिजापूर तालुक्यात सिरसो फाट्यावर त्याच्या ७ वर्षीय मुलासोबत आला, तेथे येऊन त्याने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्यावर लहान मुलाने आरडाओरडा केला असता जमलेल्या नागरिकांनी वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या सहाय्याने प्रकाश चव्हाण याला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे पाठविण्यात आले आहे.