बिल्डर संताेष मसनेंना मागितली पाच लाखांची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:47+5:302021-02-05T06:17:47+5:30
अकाेला : राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयामागे निर्माणाधीन असलेल्या आनंद वाटिका येथे पेंट हाउस तयार करून द्यावे किंवा पाच ...

बिल्डर संताेष मसनेंना मागितली पाच लाखांची खंडणी
अकाेला : राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयामागे निर्माणाधीन असलेल्या आनंद वाटिका येथे पेंट हाउस तयार करून द्यावे किंवा पाच लाख रुपयांची मागणी आशिष ढाेमने याने केल्याची तक्रार बिल्डर संताेष मसने यांनी अकाेला पाेलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर केली आहे. ढाेमने यानेही मारहाणीची तक्रार केली हाेती.
मलकापूर परिसरातील गुरुकुलनगरी येथील रहिवासी संताेष आनंदराव मसने यांनी पाेलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार केली असून, या तक्रारीनुसार त्यांची राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयामागे आनंद वाटिका अपार्टमेंटचे बांधकाम करीत आहेत. त्यासाठी मनपाने त्यांना दिलेल्या परवानगीनुसार ते बांधकाम करीत आहेत. २० जानेवारी राेजी रात्री त्यांचे चाैकीदार बाबूसिंग कनीराम राठाेड यांना आशिष आनंद ढाेमने याने मारहाण केली. ही माहिती राठाेड यांनी बिल्डर मसने यांना देताच ते बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावर पाेहाेचले. यावेळी आशिष ढाेमने याने हातात पिस्तूल घेत मसने यांना धमकावत अपार्टमेंटच्या टेरेसवर पेंट हाउस तयार करून दे किंवा पाच लाख रुपये दे नाहीतर गाेळी झाडण्याची धमकी दिल्याचे मसने यांनी तक्रारीत नमूद केले आहे. मात्र त्यानंतरही आशिष ढाेमने व त्याचा साथीदार आकाश घवशे व काही युवक बांधकामावरील मजुरांना धमकावत बांधकाम बंद करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे संताेष मसने यांनी ऑनलाइन तक्रार केली असून, दाेषींवर नियमानुसार कारवाइ करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची चाैकशी पाेलीस करीत आहेत.