शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

खोदकाम करणाऱ्या कंपनीविरुद्ध ‘बीएसएनएल’ करणार फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 1:21 PM

अकोला : पाइपलाइन आणि केबल टाकण्यासाठी अकोला शहरातील ‘बीएसएनएल’चे केबल डॅमेज करणाºया कंपनीविरुद्ध आता बीएसएनएल कंपनी एफआयआर करून फौजदारी कारवाई करणार आहे. येत्या दोन दिवसांत ही तक्रार दाखल होणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे रचना कॉलनी, विद्युत भवन, इन्कम टॅक्स, टिळक मार्ग, मानेक टॉकीज परिसर, निमवाडी, गीतानगर-बायपास आदी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सेवा विस्कळीत झाली.आडवी बोअर करताना आधी लक्झरी स्टॅन्डजवळ, नंतर निमवाडीजवळची बीएसएनएलची मुख्य केबल लाइन तोडल्या गेली आहे.कोणतीही सूचना न देता केबल टाकण्याचे काम सुरू असल्याने अनेकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.

अकोला : पाइपलाइन आणि केबल टाकण्यासाठी अकोला शहरातील ‘बीएसएनएल’चे केबल डॅमेज करणाºया कंपनीविरुद्ध आता बीएसएनएल कंपनी एफआयआर करून फौजदारी कारवाई करणार आहे. येत्या दोन दिवसांत ही तक्रार दाखल होणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत.अकोला शहरात गेल्या दोन वर्षांपासून सिमेंट काँक्रीट मार्गाची निर्मिती सुरू आहे. रचना कॉलनी, विद्युत भवन, इन्कम टॅक्स, टिळक मार्ग, मानेक टॉकीज परिसर, निमवाडी, गीतानगर-बायपास आदी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे शहरातील अनेक उद्योजकांच्या पॉस मशीन बंद पडल्या असून, त्यांना दररोज लाखोंचा फटका सहन करावा लागतो आहे. सोबतच इंटरनेट सेवा बंद पडल्याने अनेकांचे कामकाज प्रभावित झाले आहे. यातून बँका आणि शासकीय कार्यालयदेखील सुटले नाही. कोणतीही सूचना न देता केबल टाकण्याचे काम सुरू असल्याने अनेकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. आडवी बोअर करताना आधी लक्झरी स्टॅन्डजवळ, नंतर निमवाडीजवळची बीएसएनएलची मुख्य केबल लाइन तोडल्या गेली आहे. कोणतीही सूचना न देता बीएसएनएलच्या केबलला डॅमेज केले, तर नियमानुसार एफआयआर दाखल केला जातो. याबाबत संपूर्ण माहिती काढली गेली असून, दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. केबल तोडल्या गेल्याने बीएसएनएलची सेवा गत दोन दिवसांपासून विस्कळीत झाली आहे.-कृष्णा शेंदूरकर, बीएसएनएल अभियंता, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाBSNLबीएसएनएल