शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : आधी २०१६ मध्ये नोटाबंदी झाली. त्यानंतर उद्योग व्यवसायांवर परिणाम झाला. तशीच परिस्थिती कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : आधी २०१६ मध्ये नोटाबंदी झाली. त्यानंतर उद्योग व्यवसायांवर परिणाम झाला. तशीच परिस्थिती कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये झाली. मात्र तरीही नोटाबंदी आणि कोरोनाच्या संचारबंदीतही लाचखोरी जोरात असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमरावती विभागात केलेल्या कारवायांवरून समाेर आले आहे़. गेल्या साडेपाच वर्षात अमरावती परीक्षेत्रात लाचखोरीच्या ५४१ तक्रारी आल्या. तर कोरोनातील दीड वर्षांच्या काळातही ८५ तक्रारी दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुळात, लाच देणे आणि घेणे हे दोन्हीही बेकायदा आहे. परंतु, आपले काम विनाविलंब व्हावे, यासाठी कधी कधी सामान्य नागरिक हे कायदेशीर किंवा बेकायदा कामे विनाअडथळा होण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांपासून ते अगदी महसूल अधिकाऱ्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लाचेचे आमिष दाखवितात. तर काही वेळा याच अधिकाऱ्यांकडून अशा लाचेची मागणी केली जाते. लाच दिली जात नाही तोपर्यंत अडवणूक केली जाते. परंतु, नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अशा लाचखोरांविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन अकाेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

पोलीस आणि महसूल खाते आघाडीवर

२०२१ मध्ये अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३१ जुलैपर्यंत लाचेची ५९ प्रकरणे दाखल झाली. यात सर्वाधिक सात प्रकरणे महसूल विभागाच्या विरोधातील आहेत़ त्यापाठोपाठ पाेलीस विभाग पाच, महानगरपालिकेच्या चार तर जिल्हा परिषदेतील चार लाचखोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे़

लाच ५०० पासून पाच लाखांपर्यंत...

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या पिंजर येथील एका अभियंत्याने ५०० रुपयांची लाच मागितली हाेती़ या लाचखाेरी प्रकरणात अकाेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या लाचखाेर अभियंत्यास अटक केली हाेती़ यावरून ५०० रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंत लाच मागण्यात येत असल्याचे वास्तव आहे़

आराेग्य विभागातील आराेग्य उपसंचालक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितली हाेती़ या प्रकरणात अकाेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित अधिकाऱ्यास लाचेतील पहिला हप्ता घेताना रंगेहाथ अटक केली हाेती़ तर घरझडतीमध्येही माेठ्या प्रमाणात रक्कम आढळली हाेती़

‘‘ शासकीय कामांसाठी कोणी लाचेसाठी अडवणूक करीत असेल तर न डगमगता सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींविरुद्ध नागरिकांनी तक्रार करावी. तक्रार केल्यानंतर आपले काम होणार नाही, अशी एक अनाठायी भीती असते. परंतु, ते काम कायदेशीर असेल तर ते होण्यासाठी एसीबीकडूनही पाठपुरावा केला जातो. त्यामुळे कोणी लाच देणे-घेणे करू नये. तक्रार आली तर एसीबीकडून शहानिशा करून कारवाई केली जाते.

शरद मेमाने उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकाेला

...........................

वर्ष लाच प्रकरणे

२०१६- ११०

२०१७-८७

२०१८- ९७

२०१९- १०३

२०२०- ८५

२०२१ (३१ जुलैपर्यंत)-५९

......................................