लाचखोर जमादार गजाआड

By Admin | Updated: November 8, 2016 02:20 IST2016-11-08T02:20:55+5:302016-11-08T02:20:55+5:30

वाशिमच्या एसीबीची चान्नीत कारवाई

Bribery Jamadar Gajaad | लाचखोर जमादार गजाआड

लाचखोर जमादार गजाआड

खेट्री (अकोला) दि. ७- जुगाराच्या कारवाईतील नाव काढून टाकण्यासाठी ३ हजारांची लाच स्वीकारणार्‍या चान्नी येथील पोलीस जमादारास वाशिमच्या लाचलुचत विभागाने ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३0 सापळा रचून रंगेहात अटक केली.
झरंडी येथील सैन्यात असलेल्या सचिन जाधव याच्या लहान भावाचे नाव जुगाराच्या धाडीत टाकण्यात आले होते. हे नाव काढण्यासाठी चान्नीचे जमादार रामेश्‍वर चौधरी यांनी दहा हजारांची लाच मागितली. जाधव यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी वाशिम येथील लाचलुचपत पथकाकडे तक्रार केली. तडजोडीनंतर ३ हजार रुपये देण्याचे ठरले. ७ नोव्हेंबर रोजी चान्नी पोलीस स्टेशनच्या आवारात ३ हजार रुपये स्वीकारताना रामेश्‍वर चौधरी यास वाशिम एलसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Bribery Jamadar Gajaad