लाचखोर पोलीस कर्मचारी निलंबित

By Admin | Updated: June 2, 2017 01:39 IST2017-06-02T01:39:56+5:302017-06-02T01:39:56+5:30

अकोला: १,५00 रुपयांची लाच मागणाऱ्या बोरगावमंजू येथील दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गुरुवारी रात्री निलंबित करण्याचा आदेश दिला.

The bribe police personnel suspended | लाचखोर पोलीस कर्मचारी निलंबित

लाचखोर पोलीस कर्मचारी निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई न करण्यासाठी १,५00 रुपयांची लाच मागणाऱ्या बोरगावमंजू येथील दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गुरुवारी रात्री निलंबित करण्याचा आदेश दिला.
बोरगावमंजू पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर पांडुरंग इंगळे आणि पोलीस कॉन्स्टेबल हरीश शालिग्राम सातव हे अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला फौजदारी कारवाई न करण्यासाठी १,५00 रुपयांची मागणी करीत होते.
त्यामुळे तक्रारदाराने २२ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची मागणी करणाऱ्या मनोहर इंगळे, हरीश सातव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. पोलीस कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गुरुवारी त्यांना निलंबित केले.

Web Title: The bribe police personnel suspended