पुराच्या पाण्यात मुलगा वाहून गेला!
By Admin | Updated: June 16, 2017 00:48 IST2017-06-16T00:48:38+5:302017-06-16T00:48:38+5:30
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यात १५ जून रोजी सायंकाळी तब्बल एक तास मुसळधार पाऊस पडला. आठवडी बाजारातून वाहणाऱ्या नाल्यात एक आठवर्षीय मुलगा वाहून गेल्याचे वृत्त आहे.

पुराच्या पाण्यात मुलगा वाहून गेला!
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यात १५ जून रोजी सायंकाळी तब्बल एक तास मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे येथील शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातून वाहणाऱ्या नाल्यात एक आठवर्षीय मुलगा वाहून गेल्याचे वृत्त आहे.
मूर्तिजापूर तालुुक्यात गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सुमारे एक तासपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे मूर्तिजापूर शहरातील आठवडी बाजार ते लकडगंज या भागाजवळून वाहणाऱ्या नाल्याला पूर आला. या पूरात तिन लहान मुले वाहुन गेली होती. त्यापैकी दोन सापडली. साहद शेख रफीक हा नऊ वर्षीय मुलगा वाहून गेला. दरम्यान पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरू केला आहे.