मुलाने पित्यास चाकूने भोसकले!

By Admin | Updated: September 14, 2016 00:57 IST2016-09-14T00:57:10+5:302016-09-14T00:57:10+5:30

खामगाव तालुक्यातील गणेशपूर येथील घटना; क्षुल्लक कारणावरुन वाद.

The boy stabbed his father! | मुलाने पित्यास चाकूने भोसकले!

मुलाने पित्यास चाकूने भोसकले!

खामगाव(जि.बुलडाणा), दि. १३ : घरगुती कारणावरून वाद होऊन मुलाने पित्यास चाकूने भोसकून जखमी केल्याची घटना तालुक्यातील गणेशपूर येथे घडली. याबाबत शेजारी राहणार्‍या नातेवाईक महिला सत्यभामा महादेव लठाड (वय ५0) रा. गणेशपूर यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, पांडुरंग मनोहर लठाड (वय २३) याने काल रात्री ह्यजेवणासाठी दाळ का केलीह्ण असे म्हणून आईशी वाद घातला. यावेळी त्याचे वडील मनोहर लठाड (वय ५३) यांनी त्यास हटकून ह्यतू दारूच्या दुकानावर का बसतोह्ण, असे म्हटले. यावरून वाद घालून पांडुरंग याने वडील मनोहर यांच्या पोटात चाकू भोसकून त्यांना जखमी केले, तसेच धिंगाणा घालत घरातील टीव्हीदेखील फोडला. या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी पांडुरंग लठाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: The boy stabbed his father!