नॅशनल मिलटरी स्कूलचा बॉक्सिंग स्पर्धेवर दबदबा

By Admin | Updated: August 21, 2014 01:01 IST2014-08-20T21:50:12+5:302014-08-21T01:01:23+5:30

१७ वर्षाआतील शालेय बॉक्सिंग स्पर्धेवर गायगावच्या नॅशनल मिलटरी स्कूलचा दबदबा राहिला.

Boxing competition of National Millerary School | नॅशनल मिलटरी स्कूलचा बॉक्सिंग स्पर्धेवर दबदबा

नॅशनल मिलटरी स्कूलचा बॉक्सिंग स्पर्धेवर दबदबा

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे बुधवार, २० ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या १७ वर्षाआतील शालेय बॉक्सिंग स्पर्धेवर गायगावच्या नॅशनल मिलटरी स्कूलचा दबदबा राहिला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित या स्पर्धेत ग्रामीण व शहर विभागातील शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भ˜ यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल
ग्रामीण क्षेत्र : साकीब पठाण, अक्षय बोदडे नॅशनल मिलटरी स्कूल गायगाव, शुभम गवई तुळसाबाई कावल विद्यालय पातूर, ऋषिकेश गावंडे नॅशनल मिलटरी स्कूल, चेतन चव्हाण महात्मा फुले पिंजर, समर्थ मेश्राम नॅशनल मिलटरी स्कूल, श्रीकांत चव्हाण नॅशनल मिलटरी स्कूल, ऋषिकेश बोराडे नॅशनल मिलटरी स्कूल, राहिल सिद्धीकी प्रभात किडस् सोमठाणा, मो. अरसलाम शाहबाबू विद्यालय पातूर, कुणाल उमाळे नॅशनल मिलटरी स्कूल, मयूर सरप प्रभात किडस्.
मनपाक्षेत्र : विशाल सुपे, प्रज्वल डोंगरे, अब्दुल अजहर, अमन शर्मा, अजहर अली, अभिजित लांडे, क्षितिज तिवारी, महेश तायडे, जयेश यादव, संकेत अंबरते, ऋषिकेश फंदाट, पवन रायबोले, अजय आसेरी भिकमचंद विद्यालय, मुलींमध्ये तेजल चव्हाण नोएल कॉन्व्हेंट, गौरी जयसिंगपुरे, अश्विनी सोनोने, स्वाती वानखडे, पल्लवी हेरोडे, साक्षी गायधनी, दिव्यानी जंजाळ, राजेश्वरी मिश्रा यांनी विजय मिळविला. 
...

Web Title: Boxing competition of National Millerary School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.