गोरक्षण रोडवरील ‘बॉटलनेक’ होणार दूर

By Admin | Updated: May 28, 2017 03:49 IST2017-05-28T03:49:41+5:302017-05-28T03:49:41+5:30

मनपाने केले २५ इमारतींचे मोजमाप; पाठपुरावा लोकमतचा.

A 'BottleNake' on Gorakh Road would be far away | गोरक्षण रोडवरील ‘बॉटलनेक’ होणार दूर

गोरक्षण रोडवरील ‘बॉटलनेक’ होणार दूर

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गोरक्षण रोड ते संत तुकाराम हॉस्पिटल चौकपर्यंंंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणार्या इन्कमटॅक्स चौकातील ह्यबॉटलनेकह्ण दूर करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. या पृष्ठभूमीवर शनिवारी नगररचना विभागाच्या वतीने महापारेषण कार्यालय चौक ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंंंतच्या सुमारे ५00 मीटर अंतरावरील २५ इमारतींचे मोजमाप आणि मार्किंंंग करण्यात आले आहे. या संदर्भात लोकमतमधून वारंवार वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा करण्यात आला होता. हे विशेष
मागील काही दिवसांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाच्या समन्वयातून शहरातील रस्ते दुरुस्तीचा कामाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये शहराच्या विविध भागाम सिमेंट काँक्रिटचे प्रशस्त रस्ते, दुभाजक व त्यामध्ये एलक्ष्डी पथदिव्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकापर्यंंंत २ हजार ६३१ मीटर अंतराचा रस्ता किमान १५ मीटर रुंद करण्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या बाजूला भविष्यात भूमिगत गटार वाहिनीचे जाळे, पदपाथ होणार आहेत. यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजू प्रशस्त असणे गरजेचे आहे. मनपाच्या डेव्हलपमेंट प्लाननुसार हा रस्ता २४ मीटर रुंद असला तरी महापारेषण कार्यालय चौक ते इन्कमटॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंंंत तो अवघा १२ मीटर रुंदीचा आहे. रस्त्यालगतच्या व्यावसायिकांची दुकाने रस्ता रुंदीकरणाच्या आड येत आहेत. या ठिकाणी निर्माण होणरा बॉटलनेक लक्षात घेता, मनपा प्रशासनाच्यावतीने शनिवारी रस्त्यालगतच्या २५ इमारतीची मार्किंंंग करण्यात आली. ही दुकाने, हॉटेल व घरे हटविण्यासाठी मनपाच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

व्यावसायिकांची हायकोर्टात धाव
बॉटलेनक दूर करण्यासाठी खासगी जमिनीची एक इंचही जागा देणार नसल्याची भूमिका घेत काही व्यावसायिकांनी नागपूर हायकोर्टात याचिका दाखल करून मनपाच्या संभाव्य कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

शहराच्या विविध भागात प्रशस्त रस्त्यांची निर्मिती करण्यात येत असून, ही शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठी बाब आहे. त्या पृष्ठभूमीवर गोरक्षण रोडवरील बॉटलनेक दूर केल्या जाईल. त्यासाठी इमारतींचे मार्किंंंग करण्यात आले. संबंधित मालमत्ताधारकांनी मनपाला सहकार्य करून शहराच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, ही अपेक्षा.
- अजय लहाने, आयुक्त, मनपा, अकोला.

Web Title: A 'BottleNake' on Gorakh Road would be far away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.