दुचाकी अपघातात दोघे गंभीर
By Admin | Updated: March 21, 2017 14:18 IST2017-03-21T14:18:27+5:302017-03-21T14:18:27+5:30
सावखेड तेजन फाट्यावर दुचाकी झाडावर आदळून दोघे जण जखमी झाल्याची घटना २० मार्च रोजी सायंकाळी घडली.

दुचाकी अपघातात दोघे गंभीर
सिंदखेड राजा : सिंदखेडराजा मार्गे हिंगोलीकडे जात असताना सावखेड तेजन
फाट्यावर दुचाकी झाडावर आदळून दोघे जण जखमी झाल्याची घटना २० मार्च रोजी
सायंकाळी घडली.
हिंगोली जिल्ह्यातील हर्षद पाटील व वैभव हेंबाळे यांना प्रथम सिंदखेडराजा
ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन जालना येथे उपचारासाठी पाठविण्यात आले
आहे. हर्षद पाटील व वैभव हेंबाळे एम.एच.१४ बी.क्यू.२७७७ क्रमांकाच्या
दुचाकीवरुन सिंदखेडराजा मार्गे हिंगोलीकडे जात असताना सावखेड तेजन
फाट्यावर दुचाकी झाडावर आदळली. त्यामध्ये हर्षद पाटलाचा पाय फ्रॅक्चर
झाला असून, वैभव हेंबाळे याचे डोक्याला मार लागला आहे. त्यांना प्रथम
सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन जालना येथे पाठविण्यात आले.
सिंदखेडराजा पोलिस ठाणेदार एस.एम.जाधव यांनी घटनास्थळावर जाऊन मोटारसायकल
ताब्यात घेतली असून, पुढील तपास सुरु आहे.