तेल्हार्यात पुस्तकाच्या दुकानास आग
By Admin | Updated: June 3, 2014 20:53 IST2014-06-03T20:19:36+5:302014-06-03T20:53:38+5:30
तेल्हार्यात पुस्तकाच्या दुकानाला आग लागून ५० हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना ३ जूनला घडली.

तेल्हार्यात पुस्तकाच्या दुकानास आग
तेल्हारा : स्थानिक संत तुकाराम महाराज चौकातील वैशाली बुक्स एम्पोरियम या पुस्तकाच्या दुकानाला आग लागून ५० हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना ३ जूनला दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली.
सेठ बन्सीधर हायस्कूलसमोर असलेल्या वैशाली बुक्स एम्पोरियम या दुकानाला अचानक आग लागल्याने दुकानातील लेटरबुक, पुस्तक, वा आदी शालेय साहत्यि जळून अंदाजे ५० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. दुकानामध्ये आग लागल्याचे समजताच आजुबाजूच्या व्यावसायिकांनी व नागरिकांनी युद्धपातळीवर पाण्याचा वार करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी हानी टळली. आग निित कशामुळे लागली हे समजू शकले नाही.