शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील २५ वर बुकींचा छत्तीसगढमध्ये ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:14 IST

अकोला: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यातील निवडणुकीत शुक्रवारी मतदान प्रक्रिया आटोपताच अकोल्यातील सट्टा माफियांनी (बुकींनी) थेट छत्तीसगढ गाठून या पाचही राज्यातील सत्तेसह, बड्या राजकीय नेत्यांच्या जय-पराजयावर कोट्यवधी रुपयांचा सट्टाबाजार सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

- सचिन राऊत 

अकोला: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यातील निवडणुकीत शुक्रवारी मतदान प्रक्रिया आटोपताच अकोल्यातील सट्टा माफियांनी (बुकींनी) थेट छत्तीसगढ गाठून या पाचही राज्यातील सत्तेसह, बड्या राजकीय नेत्यांच्या जय-पराजयावर कोट्यवधी रुपयांचा सट्टाबाजार सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.देशातील सट्टाबाजारामध्ये अकोल्यातील सट्टा माफियांचे कुप्रसिद्ध असे मोठे नाव आहे. क्रिकेट, सोन्यासह दागिन्यांचे रोजचे भाव, पाऊस व निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येतो. यामध्ये अकोल्यातील सट्टा माफिया प्रत्येक वेळी प्रचंड सक्रिय होत असल्याचे वास्तव आहे. देशातील पाच राज्यातील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर मंगळवारी निकाल जाहीर होणार आहेत; मात्र हे निकाल येण्यापूर्वी पाच राज्यातील सत्ता आणि भाजपा, काँगे्रस, टीआरएसएच आणि मिझो नॅशनल फ्रंटच्या बड्या नेत्यांच्या विजय आणि पराभवावर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावण्यात येत आहे. यासाठी अकोल्यातील बड्या बुकींची एक टीमच छत्तीसगढमधील रायपूर आणि आणखी एका शहरात दाखल झाली असून, त्यांनी यामध्ये कोट्यवधी रुपयांची बुकिंग घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये ‘मामा’, एका औषधी प्रतिष्ठान संचालकाचा भाऊ, ‘जय माता दी’ प्रचलीत असलेल्या गृपमधील पाच ते सहा सट्टामाफीया, कापड व्यवसायात उतरलेला माफीया, ‘कल्ल्या’, बोरगाव मंजूतील छाप्यात सापडलेला ‘गिरीश’ यांच्यासह २५ सट्टा माफिया छत्तीसगढमध्ये ठिय्या मांडून सट्टा बाजार चालवित असल्याची माहिती आहे. यामध्ये अकोल्यातील अनेकांनी सट्टा लावल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, यामधील बहुतांश माफिया हे अकोला पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील असल्याचेही वास्तव आहे.या नेत्यांवर लागला अधिक सट्टामध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान, कमलनाथ, राजस्थानच्या वसुंधरा राजे, सचिन पायलट, अशोकसिंह गहलोत, तेलंगणाचे चंद्रशेखर राव, जगदीश रेड्डी, रामा राव, छत्तीसगढमध्ये रमण सिंह यांच्यासह मिझोरमधील काही बड्या दिग्गज नेत्यांच्या जय-पराजयावर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावण्यात आला आहे.

सट्टा माफियांकडे पोलिसांचे दुर्लक्षतत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या धाकापोटीच सट्टा माफियांनी हा गोरखधंदा अकोल्यातून गुंडाळत वाशिममध्ये सुरू केला होता; मात्र मीणा यांनी वाशिम पोलिसांना सोबत घेऊन सदर सट्टा माफियांना वाशिम शहरातून अटक केली होती; मात्र त्यानंतर सट्टा माफियांकडे अकोला पोलिसांची पूर्णत: डोळेझाक असून, पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूकChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018