पोहरा नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:22 IST2019-08-10T13:19:47+5:302019-08-10T13:22:14+5:30

पुरात वाहून गेलेल्या महेंद्र उर्फ धम्मा रामकृष्ण वानखडे या युवकाचा मृतदेह शनिवारी आढळून आला.

The body of a young man who drowned in flood was found | पोहरा नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

पोहरा नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

ठळक मुद्देमहेंद्र ऊर्फ धम्मा रामकृष्ण वानखडे हा युवक शुक्रवारी शेतात जात होता यावेळी त्याचा पाय घसरल्याने तो पोहरा नाल्याच्या पुरात पडून वाहून गेला. घटनास्थळापासून काही अंतरावर एका शेताच्या काठावर शेतमालकाला महेंद्रचा मृतदेह आढळून आला.


तेल्हारा : तालुक्यातील दापुरा येथील पोहरा नाल्याच्या पुरात शुक्रवारी दुपारी पोहरा नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या महेंद्र उर्फ धम्मा रामकृष्ण वानखडे या युवकाचा मृतदेह शनिवारी आढळून आला. कालपासून त्याचा मृतदेह शोधण्यासाठी शोधकार्य सुरु होते. अखेर शनिवारी घटनास्थळापासून काही अंतरावरील शेतात त्याचा मृतदेह आढळून आला.
तेल्हारा तालुक्यातील दापुरा येथील महेंद्र ऊर्फ धम्मा रामकृष्ण वानखडे हा युवक शुक्रवारी शेतात जात होता. यावेळी त्याचा पाय घसरल्याने तो पोहरा नाल्याच्या पुरात पडून वाहून गेला. शुक्रवारी दिवसभर शोधमोहिम राबविण्यात आली; परंतु त्याचा शोध लागला नव्हता. शनिवार, १० आॅगस्ट ला सकाळी घटनास्थळापासून काही अंतरावर एका शेताच्या काठावर शेतमालकाला महेंद्रचा मृतदेह आढळून आला. यावेळी तेल्हारा ठाणेदार विकास देवरे व त्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून, पंचनामा सुरू आहे.

Web Title: The body of a young man who drowned in flood was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.