नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:42 IST2019-09-29T12:41:58+5:302019-09-29T12:42:07+5:30

शशिकांत बळवंत वाघ असे मृतक युवकाचे नाव आहे.

The body of the young man found who was flush out in the river | नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

बोरगाव मंजू (जि. अकोला): बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरोडी येथील लोणार नाल्यात एक 35 युवक वाहुन गेल्याची घटना शनिवारी 28 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता घडली. अखेर २९ सप्टेंबर रविवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. शशिकांत बळवंत वाघ असे मृतक युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार बोरगाव मंजु पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरोडी येथील शशिकांत बळवंत वाघ (३५) वर्ष हा युवक शनिवारी तीन वाजता दरम्यान वरोडी शेतशिवारातील लोणार नाल्या जवळून जात असताना वाहुन गेला. शशिकांत सायंकाळपर्यंत घरी पोहचले नाही. त्यामुळे नातेवाईकांकडून शोध घेतला तसेच बोरगाव मंजु पोलीस ठाण्यात माहीती दिली. रविवारी सकाळी अखेर शशिकांत याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहीती मिळताच ठाणेदार हरिश गवळी, जमादार अरुण गोपनारायन , सचिन सोनटक्के यांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. नातेवाईकांकडून फिर्याद दाखल वरून पोलीस दफ्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास ठाणेदार हरिश गवळी यांच्यासह पोलीस करीत आहेत.

 

Web Title: The body of the young man found who was flush out in the river

टॅग्स :Akolaअकोला