मृतदेह नदीत वाहून गेला, दाेन पाेलीस कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:24 IST2021-09-09T04:24:01+5:302021-09-09T04:24:01+5:30

रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी युवक दर्शन शुक्ला हा गांधीग्राम येथे कावड घेऊन गेला होता. मात्र तो घरी ...

The body was swept away in the river, Daenerys staff suspended | मृतदेह नदीत वाहून गेला, दाेन पाेलीस कर्मचारी निलंबित

मृतदेह नदीत वाहून गेला, दाेन पाेलीस कर्मचारी निलंबित

रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी युवक दर्शन शुक्ला हा गांधीग्राम येथे कावड घेऊन गेला होता. मात्र तो घरी न आल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याची शोधाशोध सुरू केली. रामदास पेठ पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर त्याचा मृतदेह बोरगाव वैराळे येथे नदीमध्ये सापडला. ही माहिती पाेलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नदीपात्राबाहेर काढून ताे काठावर ठेवला़ मात्र पाऊस वाढल्यानंतर मृतदेह नदीपात्रात वाहून गेला़ यावेळी या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र मृतदेह पुन्हा वाहून गेल्याने यामध्ये संशय असल्याचा आराेप मृतक युवकाचे आई-वडिलांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केला हाेता़ तसेच दाेषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती़ त्यानंतर पोलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांनी मंगळवारी पोलीस कर्मचारी नेमाळे व झापर्डे या दोघांना निलंबित केले आहे.

Web Title: The body was swept away in the river, Daenerys staff suspended