अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
By Admin | Updated: June 6, 2014 01:18 IST2014-06-05T18:34:13+5:302014-06-06T01:18:06+5:30
पिंजर पोलिसस्टेशन हद्दीतील धाकली शेतशिवारात ४५ वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला.

अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
पिंजर: स्थानिक पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या धाकली शेतशिवारात गुरुवार, ५ जून रोजी एका ४५ वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. गुलाबराव शिंदे यांच्या शेतात आढळून आलेल्या या इसमाच्या मृतदेहाचा रंग सावळा असून, फिकट गुलाबी रंगाचा पँट शर्ट परिधान केलेला आहे. त्याच्या उजव्या हातात कडे असून, दाढी वाढलेली आहे. पिंजर पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविला आहे.