The body of the missing teenager was found | दहा दिवसांपासून बेपत्ता युवकाचा मृतदेहच आढळला
दहा दिवसांपासून बेपत्ता युवकाचा मृतदेहच आढळला

अकोला: वल्लभनगर येथील रहिवासी जॉन धांदे हा गत १० दिवसांपासून बेपत्ता झाल्यानंतर या युवकाचा मृतदेहच हिंगणा तामसवाडीजवळील पूर्णा नदीपात्रात मंगळवारी तरंगताना आढळला. याप्रकरणी अकोट फैल पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सदर युवकाच्या मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
वल्लभगनर येथील रहिवासी जॉन ऊर्फ प्रेमदास प्रल्हाद धांदे (२९) हा युवक गत १० दिवसांपासून बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला असता कुठेही थांगपत्ता लागला नाही; मात्र १० दिवसांपाून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह पूर्णा नदीपात्रात असल्याची माहिती अकोट फैल पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश अणे यांना मिळाली. यावरून त्यांनी हिंगणा तामसीवाडी परिसरात पूर्णा नदीमधून मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. यावेळी केलेल्या तपासणीत आढळून आले की, नदीपात्रात आढळलेला मृतदेह हा जॉन प्रेमदास धांडे याचा असून, तो मागील १० आॅक्टोबरपासून बेपत्ता होता. मृतकाची बेपत्ता असल्याची तक्रारही पोलीस ठाण्यात दाखल आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

 


Web Title: The body of the missing teenager was found
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.