राज्यभरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 11:29 AM2020-09-02T11:29:34+5:302020-09-02T11:29:49+5:30

प्रामुख्याने निगेटिव्ह रक्तगटाची चणचण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

Blood shortage in blood banks across the state! | राज्यभरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा!

राज्यभरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा!

Next

अकोला : राज्यभरातील रक्तपेढ्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, जवळपास सर्वच रक्तगटाचा तुटवडा आहे. बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा उपलब्ध नसल्याने थॅलेसिमियासह इतर गंभीर आजाराच्या रुग्णांना रक्त मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. रक्तदानासाठी रक्तदाते तयार होत नसल्याने निगेटिव्ह रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असताना त्याचा थेट परिणाम रक्तसंकलनावर दिसून आला. मे, जून आणि जुलै महिन्यात बहुतांश ठिकाणी रक्तदान शिबिरे झालीच नसल्याने रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला. त्याचा सर्वाधिक फटका थॅलेसिमियासह इतर रक्ताशी निगडित रुग्णांना बसला आहे. या रुग्णांना नियमित रक्ताची गरज भासते; मात्र रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा उपलब्धच नसल्याने अशा रुग्णांची मोठी पंचाईत झाली आहे. प्रामुख्याने निगेटिव्ह रक्तगटाची चणचण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

या रक्तगटाची उपलब्धता शून्य!
गत चार ते पाच महिन्यात जवळपास सर्वच रक्तगटांचा तुटवडा जाणवत आहेत; मात्र निगेटिव्ह रक्तगटाचा विचार केल्यास रक्तपेढ्यांमध्ये शून्य उपलब्धता असल्याने निदर्शनास येते. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, राज्यभरातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये ए-, बी-, ओ-, एबी- या निगेटिव्ह रक्तगटाची उपलब्धता शून्य दिसून येते.

रक्तसंकलनाला कोरोनाचा फटका बसला आहे. रक्तसंकलन वाढविण्यासाठी नियमांचे पालन करून शिबिरे घेण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रक्तदात्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.
- डॉ. श्रीराम चोपडे, विभाग प्रमुख, शासकीय रक्तपेढी, अकोला

 

Web Title: Blood shortage in blood banks across the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.