आमदार देशमुख वाढदिवस निमित्त रक्तदान व धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:51+5:302021-06-06T04:14:51+5:30

माजी आमदार संजय गावंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी शिवसेना ...

Blood donation and distribution of food grains on the occasion of MLA Deshmukh's birthday | आमदार देशमुख वाढदिवस निमित्त रक्तदान व धान्य वाटप

आमदार देशमुख वाढदिवस निमित्त रक्तदान व धान्य वाटप

माजी आमदार संजय गावंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने, जि. प. सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ, बाजार समिती संचालक प्रा. अतुल म्हैसने, विलास साबळे यांच्या हस्ते गरजू लोकांना धान्य वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरात शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, तालुका प्रमुख श्याम गावंडे, शहर प्रमुख सुनील रंधे, अकोट एसटी आगर सचिव विनोद भाकरे पाटील यांनी रक्तदान शिबिराला प्रारंभ केला. अकोट येथील कोविड सेंटरला जेवणाची व्यवस्था तसेच स्मशानभूमी, ग्रामीण रुग्णालय व कबुतरी मैदान येथे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे व आभार प्रदर्शन श्याम गावंडे, सुनील रंधे यांनी केले. यावेळी प्रामुख्याने सुभाष सुरत्ने, शहर संघटक रोशन पर्वतकार, धीरज गिते (सरपंच ), अविनाश गावंडे (सरपंच ), जगन निचळ (सरपंच), गोपाल कावरे, अतुल नवात्रे, धीरज गावंडे, दिनेश बोचे, डॉ. योगेश गायकवाड, विलास ठाकरे, संजय भट्टी, कुणाल कुलट, अनिल जंवजाळ, सोपान साबळे, विजय भारसाकळे, शिवा गोटे, मुरलीधर मेंढे, अक्षय घायल, प्रशांत येऊल, अनिल जवंजाळ, विजय चावरे, शिवा चोरे, दीपक रेखाते, रमेश खिरकर, मुकेश ठोकळ, संजय वानखडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.(वा.प्र.)

फोटो:

Web Title: Blood donation and distribution of food grains on the occasion of MLA Deshmukh's birthday