लोकमत रक्ताचं नातं महायज्ञात ५१ प्रहार सेवकांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:13 IST2021-07-09T04:13:58+5:302021-07-09T04:13:58+5:30
आजची कोविड परिस्थिती व रक्ताच्या तुटवड्याचे गांभीर्य लक्षात घेता, लोकमत रक्ताचं नातं महायज्ञअंतर्गत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराला ...

लोकमत रक्ताचं नातं महायज्ञात ५१ प्रहार सेवकांचे रक्तदान
आजची कोविड परिस्थिती व रक्ताच्या तुटवड्याचे गांभीर्य लक्षात घेता, लोकमत रक्ताचं नातं महायज्ञअंतर्गत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराला युवकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रहारच्या ५१ कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले. रक्तदान शिबिराला सय्यद मोहिन, भौरदचे सरपंच रोहित पाटील, परेश पाटील, सागर भाकरे, गिरीश टेंबे, कैलास शिंदे, शुभमसिंह ठाकूर, कुणाल जाधव, सय्यद नूर, प्रभू वानखडे, गोविंद गिरी, बॉबी पळसपगार, अक्षय माने, उल्हास खराटे, संतोष हिरूळकर, सुनील गोहर, अक्षय जुवर, यश प्रधान, श्रीकृष्ण तायडे, शिवा शिंदे, तुषार पडोळे, दत्ता महाराज पाकदाणे, एकनाथ खेडकर, बदरू शेख, नजीर शेख, प्रांजली धोरण, उषा कनोजिया, पिंटू साबळे, श्याम क्षीरसागर, आदी उपस्थित होते.
फोटो:
प्रहारच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम
पालकमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरात व जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. अपंग क्रांतीच्या वतीने जिल्ह्यातील विविध गावांत साफसफाई अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. त्याचप्रमाणे विविध महत्त्वाच्या ठिकाणी वृक्षारोपणसुद्धा करण्यात आले. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे प्रहार सेवक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लहान बालकांना नवीन कपडे तसेच दुधाच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. यासह जिल्ह्यातील अनेक गावांत गोरगरीब नागरिकांसाठी घराच्या छतावर टाकण्यासाठी २०० ताडपत्री वाटप तसेच अन्नधान्याच्या किटसुद्धा देण्यात आल्या. स्वराज्य भवन येथे रक्तदान शिबिराने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.