शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:47 IST2021-02-06T18:46:58+5:302021-02-06T18:47:25+5:30
Farmer Protest वाशिम बायपास चौक, मलकापूर, बोरगावमंजू व पातूर येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको
अकोला: केंद्र सरकारने पारीत केलेल्या शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात एल्गार पुकारित , दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान विकास मंचच्यावतीने शनिवारी अकोल्यातील वाशिम बायपास चौक, मलकापूर, बोरगावमंजू व पातूर येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने पारीत केलेल्या शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींंबा देत, शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात किसान विकास मंचच्यावतीने ६ फेब्रुवारी रोजी दुपारी अकोला शहरातील वाशिम बायपास चौक, मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्ग तसेच बोरगावमंजू व पातूर येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.