शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ब्लास्टींगचा ट्रॅक्टर विहीरीत कोसळला; एक ठार, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:38 IST

धामणगाव बढे (जि. बुलडाणा) : सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहीर खोदकामादरम्यान ब्लास्टींगचा ट्रॅक्टर चालकासह विहीरीत पडून झालल्या दुर्घटनेत एक जण ठार झाला तर चार जण जखमी झाले आहे.

धामणगाव बढे (जि. बुलडाणा) : सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहीर खोदकामादरम्यान ब्लास्टींगचा ट्रॅक्टर चालकासह विहीरीत पडून झालल्या दुर्घटनेत एक जण ठार झाला तर चार जण जखमी झाले आहे.  जखमीपैकी दौघांची प्रकृती गंभीर असून अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमीपैकी एकास औरंगाबाद येथे हलविण्यात आले असून एकावर बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात येत असलेल्या बामणदा गावानजीक असलेल्या हिवरी धरण क्षेत्रामध्ये शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.या घटनेमध्ये प्रविण रामदास सोनाने (२८) हा ठार झाला असून शिवाजी बाबुराव जाधव (२५), शेख सईद शेख नजीर (३०) हे दोघे गंभीर जखमी झाले असून अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. शिवाजी बाबुराव जाधव याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला बुलडाणा येथे प्रथमोपचार करून त्वरेने औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे तर ट्रॅक्टर चालक शेख सईद शेख नजीर याच्यावर बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.बामणदा-खांडवा या गट ग्रामपंचायतीसाठी सार्वजनिक पाणीपुरवठा योजना विहीरीचे जवळच असलेल्या हिवरी धरण क्षेत्रात खोदकाम सुरू आहे. या विहिरीत ब्लास्टींग करण्यासाठी ट्रॅक्टर आणण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास विहीरीत चार मजूर आतील खरप काढून क्रेनद्वारे वरती आणण्याचे काम करत होते. या दरम्यान, ब्लास्टींगसाठी आणण्यात आलेले ट्रॅक्टर अचानक चालकासह थेट विहीरीत कोसळले. त्यामध्ये प्रवीण रामदास सोनोने, शिवाजी बाबुराव जाधव, शेख सईद शेख नजीर हे तिघे गंभीर जखमी झाले तर अन्य दोन किरकोळ जखमी झाले होते. जखमीपैकी तिघांना बुलडाणा येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता प्रविण रामदास सोनोने यास डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे त्याचे काका तथा  सरपंच डिगांबर लक्ष्मण सोनाने यांनी सांगितले. शिवाजी जाधव यास औरंगाबाद येथे हलविण्यात आले तर शेख सईद वर बुलडाणा येथेच उपचार करण्यात येत आहे. अपघाताचे वृत्त कळताच  बामणदा, हिवरी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. 

बैलगाडी ते रुग्णवाहिकास्थानिकांनी जखमींना प्रथमत: हिवरी धरण क्षेत्रातील दुर्घटनेच्या स्थळापासून बैलगाडीद्वारे हिवरी-बामणदा मार्गावर आणले. तेथून रिक्षाद्वारे बामणदा येथे जखमींना आणण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे या जखमींना थेट बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दोघे थोडक्यात बचावलेया विहीरीचे काम  २० त २२ फुट झाले असून विहीरीचा घेर वरील बाजूस ३० फुट व तळाला २० फुट रुंद असल्याने ट्रॅक्टर विहीरीत पडल्यानंतरही खाली काम करणारे दोघे थोडक्यात बचावले. त्यांना किरकोळ इजा झाली असून ते गावातच असल्याची माहिती आहे. मात्र त्यांची नावे कळू शकली नाहीत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघातMotalaमोताळा