शासकिय तांदूळचा काळा बाजार; १८ क्विंटल तांदूळ पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 20:59 IST2022-03-24T20:59:04+5:302022-03-24T20:59:10+5:30
Black market of government rice : पोलीस स्टेशन माना येथे जीवनावश्यक वस्तु अधिनियम कलम ३,७ अनवये गुन्हा दाखल करण्यात आला.

शासकिय तांदूळचा काळा बाजार; १८ क्विंटल तांदूळ पकडला
मूर्तिजापूर : तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत शासकीय तांदूळ अवैधरित्या वाहून नेणाऱ्या मालवाहू वाहनावर कारवाई करुन विशेष थकाने २४ मार्च रोजी ४० कट्टे (१८ क्विंटल) तांदूळ जप्त केला.
माना परिसरात शासकीय तांदूळाचा काळाबाजार होत असल्याच्या माहिती वरुन माना येथील त्रिमूर्ति नगर मध्ये नाकाबन्दी केली असता एमएच ४३ एडी ९३१२ या क्रमांकाच्या मालवाहू वाहनाची झडती घेतली, त्यात ४० कट्टे भरलेला शासकीय तांदूळ आढळून आला. मोहम्मद काशिद मोहम्मद यूसुफ ३२ त्रिमूर्ति नगर माना हा सदरचा तांदूळ विक्रीसाठी नेत असताना आढळून आला. यांच्याजवळ आढळून आला. वरील मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन माना येथे जीवनावश्यक वस्तु अधिनियम कलम ३,७ अनवये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखांली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.