काळीपिवळीची धडक; एक ठार महिलेसह काळीपिवळीचा चालक जखमी
By Admin | Updated: June 3, 2014 01:52 IST2014-06-02T22:19:43+5:302014-06-03T01:52:37+5:30
अकोला: काळीपिवळी टॅक्सीने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ठार झाला. त्याच्या पत्नीसह काळीपिवळी चालक गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पातूर रोडवरील पाटणी कोल्ड स्टोअरेजजवळ घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

काळीपिवळीची धडक; एक ठार महिलेसह काळीपिवळीचा चालक जखमी
अकोला: काळीपिवळी टॅक्सीने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ठार झाला. त्याच्या पत्नीसह काळीपिवळी चालक गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पातूर रोडवरील पाटणी कोल्ड स्टोअरेजजवळ घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
सस्ती येथील राहणारे सिद्धार्थ शिवहरी अंभोरे हे त्यांची पत्नी संगीता अंभोरे हिला घेऊन एमएच ३0 डब्ल्यू ९५८८ क्रमांकाच्या मोटारसायकलने मालेगावहून लग्न समारंभ आटोपून अकोल्याकडे येत होते. दरम्यान समोरून भरधाव येणार्या एमएच ३0 बी २५९६ क्रमांकाच्या काळीपिवळी टॅक्सीने त्यांच्या मोटारसायकलला पातूर रोडवरील पाटणी कोल्ड स्टोअरेजजवळ जोरदार धडक दिली. यात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. सिद्धार्थ अंभोरे व त्यांच्या पत्नीला सवार्ेपचार रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी सिद्धार्थ अंभोरे यांना मृत घोषित केले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेली त्यांची पत्नी व काळीपिवळी टॅक्सीचा चालक यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सिद्धार्थ अंभोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष (ग्रामीण) होते. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी सवार्ेपचार रुग्णालयात मोठी गर्दी केली.
*** ट्रॅक्टरची मोटारसायकलला धडक, एकजण ठार, एक गंभीर
ट्रॅक्टरने मोटारसायकला दिलेल्या धडकेमध्ये युवक ठार झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास आपातापा रोडवर घडला.
मारोडी येथील अश्विन गणेश खोडके (२0) आणि त्याचा सहकारी ज्ञानेश्वर प्रल्हाद चव्हाण (२७) हे दोघे सायंकाळी आपातापा येथे गेले होते. त्यांचे काम झाल्यानंतर दोघेही मोटारसायकलने घरी जाण्यासाठी परतत होते. आपातापा रोडवर समोरून येणार्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात अश्विन व ज्ञानेश्वर दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सवार्ेपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अश्विनची तपासणी केल्यानंतर तो मरण पावल्याचे सांगितले. त्याचा सहकारी ज्ञानेश्वर चव्हाण याचीसुद्धा प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.