अकोला,बुलडाण्यात भाजपचा विजय
By Admin | Updated: January 12, 2016 01:33 IST2016-01-12T01:33:04+5:302016-01-12T01:33:04+5:30
अकोला व बुलडाणा जिल्हा परिषद पोटनिवडणूक

अकोला,बुलडाण्यात भाजपचा विजय
अकोला: अकोला व बुलडाणा जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एक गटात झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला. अकोला जिल्ह्यातील सिरसो गटात भाजप आणि भारिप बमंसच्या उमेदवारात रंगतदार लढत झाली. या लढतीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अहिल्या गजानन गावंडे या भारिप-बमसंचे उमेदवार सुधीर टोकळ यांचा १२७ मतांनी पराभव केला. अहिल्या गावंडे यांना ४,७८८ मते तर सुधीर ठोकळ यांना ४,६६१ मते मिळाली. बुलडाणा जिल्ह्यातील नरवेल धरणगाव गटात भाजपचे विजय पाटील यांनी तब्बल १,१६३ विजय मिळविला. विजय पाटील यांना ६२१९ मते मिळाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी साठे यांचा पराभव केला. साठे यांना ५,0५६ मते मिळाली.