भाजयुमाचे जनसंपर्क अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:24 IST2021-08-20T04:24:00+5:302021-08-20T04:24:00+5:30
‘धार्मिक स्थळे खुली करा !’ अकाेला : देशभरात मंदिरे सुरू असताना महाराष्ट्रात मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. महाविकास आघाडी ...

भाजयुमाचे जनसंपर्क अभियान
‘धार्मिक स्थळे खुली करा !’
अकाेला : देशभरात मंदिरे सुरू असताना महाराष्ट्रात मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. महाविकास आघाडी सरकार सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळ करीत असल्याचा आराेप करीत श्रीराम नवमी शाेभायात्रा समितीच्यावतीने धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी केली आहे. मागील दोन वर्षांपासून मंदिरे बंद असल्यामुळे मंदिर विश्वस्तांची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे समितीने पत्रात नमूद केले आहे.
उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीची काेंडी
अकाेला : शहरात उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानकात दाखल हाेणाऱ्या एसटी बसेस व त्या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत गर्दी करणाऱ्या ऑटाे चालकांमुळे दरराेज वाहतुकीची काेंडी हाेत आहे. उड्डाणपुलामुळे एक पदरी रस्ता खुला असल्याने वाहनधारकांना गर्दीतून वाट काढताना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे.