शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

युतीमध्ये भाजप जिंकले; आघाडीत राष्ट्रवादीला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 23:45 IST

जागा वाटपाच्या या घोळामुळे नेत्यांची सोय झाली असली तरी कार्यकर्त्यांची मात्र फरफट ठरलेलीच आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : गेल्या विधानसभेची निवडणुक स्वबळावर लढलेल्या युती व आघाडीने यावेळी सुरवातीपासूनच मैत्रीचा सुरू आळवला. जागा वाटपाच्या घोळात कुठल्यातरी एका मित्राच्या जागा कमी जास्त होणे अपेक्षीत होते त्यानुसार अकोल्यातही तो परिणाम दिसून आला. युतीमध्ये चार मतदारसंघ भाजपाकडे कायम राहिले व केवळ एका मतदारसंघावर शिवसेनेची बोळवण झाली तर आघाडीत काँग्रेसला आपल्या हक्काच्या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले. जागा वाटपाच्या या घोळामुळे नेत्यांची सोय झाली असली तरी कार्यकर्त्यांची मात्र फरफट ठरलेलीच आहे.२०१४ च्या निवडणुकीनंतर अकोला जिल्ह्यात भाजपाने शिवसेनेला कधीही सोबत घेतले नाही. महापलिका, नगरपालिका, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकांमध्येही हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. कापूस प्रश्नावर रूमणे मोर्चेच्या पासून तर पिक विम्याच्या घोळापर्यंत अनेक आंदोलने शिवसेनेने केली. महापालिकेच्या करवाढीचा मुद्दा असो की स्वच्छता, आरोग्य, पाणी प्रश्नावरही शिवसेनेने अनेकदा सत्तेतील भाजपाच्या विरोधात थेट राडा करण्यापर्यंत भूमिका घेतली. आता त्याच भाजपाचा प्रचार करून युतीधर्म पाळण्याची अडचण शिवसैनिकांसमोर आहे. विशेष म्हणजे भाजपाचे राज्यातील सर्व मोठया शहरांमध्ये एकही मतदारसंघ सेनेला दिला नाही त्यामध्ये अकोला शहराचाही समोवश होतो. महापालिकाक्षेत्राचा समावेश असलेल्या अकोला पूर्व व अकोला पश्चीम या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचा दावा कमकुवत ठरला तर अकोट मध्ये सेनेमधील अंतर्गत कलहामुळे इथेही सेनेची डाळ शिजली नाही. बाळापूरात केवळ भाजपचा आमदार नव्हता म्हणून तो मतदारसंघ सेनेला दिला. त्यामुळे हा एक मतदारसंघ सेनेला देऊन भाजपाने उर्वरित चार मतदारसंघातील शिवसेनेची ताकद पदरात पाडून घेतली. विशेष म्हणजे बाळापुरातही सेनेच्या उमेदवारसमोर भाजपासह शिवसंग्रामच्याही बंडखोरीचे आव्हान उभे ठाकलेले असल्याने सेनेची कोंडी करण्याचीच राजकीय खेळी स्पष्टपणे समोर आली आहे. उद्या बंडखोरी मागे आलीच तरीही प्रगट झालेला विरोध हा शिवसेनेसाठी धोक्याचेचे संकेत देणारा आहे.युतीमध्ये ज्या प्रमाणे भाजपा फायद्यात राहिला त्याच प्रमाणे आघाडीत राष्टÑवादी काँग्रेसला लाभ झाला. आघाडीमध्ये आतापर्यंत केवळ मुर्तीजापूरातच लढत देणारी राष्टÑवादी काँग्रेस यावेळी बाळापूरमध्येही रिंगणात राहिली त्यामुळे काँग्रेसचा परंपरागत व एक गठठा मतदान असलेल्या मतदारसंघ काँगे्रसला सोडावा लागला आहे.विशेष म्हणजे अकोला पश्चीम हा मुस्लीम बहूल मतदारसंघ असला तरी या मतदारसंघात गेल्या पंचविस वर्षात भाजपाच्या साम्राज्याला धक्का बसलेला नाही. या उलट बाळापूर मतदारसंघात गेल्या पंचविस वर्षात भाजपा, भारिप ने दोन वेळा तर काँग्रेसला एक वेळ संधी मिळाली त्यामुळे सध्याची समाजीक समिकरणे पाहता काँगे्रससाठी बाळापूर मतदारसंघ कमी आव्हानाच होता, त्याच मतदारसंघावर पाणी सोडून भाजपच्या गडात काँग्रेस ढकलण्यात राष्टÑवादी यशस्वी झाल्याचे दिसून येते. युती आघाडीच्या या फायद्या तोटयाचे खरे परिणाम निकालानंतरच समोर येतील सध्या तरी या दोन्ही आघाडयांमधील मनोमिलनाची प्रक्रियाच सुरू असून रुसवे फुगवे कमी करण्यावर भर दिला जात आहे. मोठया नेत्यांच्या सभेमध्ये शक्तीप्रदर्शन करून या मनोमिलनावर शिक्कामोर्तब करण्यावर दोन्ही पक्षांचा भर राहिल हे निश्चीत. नेत्यांची निवडणूक, कार्यकत्यांची फरफट२०१४ मध्ये स्वबळावर लढलेल्या भाजपने संपूर्ण कार्यकाळात स्वबळाचीच भाषा केली तर शिवसेनेनेही सत्तेराहून विरोधकांची भूमिका पत्करल्यामुळे गाव पातळीवरचा शिवसैनिक सरकारच्या अर्थात भाजपच्या विरोधात टोकाची भूमिका घेतांना दिसला. पक्षाच्या धोरणानुसार कार्यकर्त्यांनी गावागावा आंदोलने केली अन् त्यामधूनच वैचारिक विरोधाचे रूपांतर आपसूकच राजकीय वैरात झाले. एखादा दूसरा अपवाद वगळला तर हेच चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळेल. दूसरीकडे नेत्यांच्या निवडणुकीत युती व आघाडीसाठी सर्वच पातळीवर प्रयत्न होतो मात्र े कार्यकर्त्यांना सत्तेत जाण्याची संधी देणारी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुक आली की कार्यकर्त्याला स्वबळाच्या परिक्षेला बसविले जाते त्यामुळे आता युती धर्म पाळतांना कार्यकर्त्यांची होणारी घुसमट निकालातून पाहण्यास मिळाली तर आश्चर्य वाटायला नको अशी स्थिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस