शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-राष्ट्रवादीने सत्तेसाठी एकत्र येणे पूर्वनियोजीतच होते - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:39 IST

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची घेतली, तेव्हाच हे सर्व शिजले होते.

अकोला : राज्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा दावा करीत घाई घाईत शपथविधी उरकणे हे अचानक घडलेले नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची घेतली, तेव्हाच हे सर्व शिजले होते. आपण तसा इशाराही दिला होता, अशी प्रतिक्रीया वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी व्यक्त केली.राज्यात सत्ता स्थापनेचा तीढा सुटत असताना आणि महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा फॉर्म्यूला निश्चित झाला असतानाच, शनिवारी सकाळीच भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला. एवढेच नव्हे, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधीही उरकण्यात आला. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले, की ही घडामोड अचानक झालेली नाही. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हाच असे काही तरी होणार याचा आपल्याला अंदाज आला होता. सत्तास्थापनेत शिवसेनेचा पोपट होऊ शकतो, असा इशाराही आपण दिला होता. परंतु, राजकारणातील चातुर्य कमी पडल्याने त्यांची फसवणूक झाली, असे आंबेडकर म्हणाले.राज्यपालांचे काम घटनेला धरून नाहीदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी सकाळीच उरकण्यात आला. राज्यपालांनी घाईघाईत हा शपथविधी केला. हे काम घटनेला धरून नाही. लोकांना विश्वासात घेऊन शपथविधीची पूर्वकल्पना द्यायला हवी होती. राज्यपालांकडून लोकांना विश्वासात न घेता कारभार झाला, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019