अकोला : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता काबीज केल्याबद्दल अकोल्यातील भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी जल्लोष केला. खा संजय धोत्रे , आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, डा.ॅ रामदास आंबटकार, डॉ. उपेंद्र कोठीकर यांच्या मार्गदर्शनात महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यालय, जय प्रकाश नारायण चौक, गीता नगर व शहरात ठीक ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे व लाडू वाढले तसेच आतिषबाजी केली. ढोल-ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी नृत्य केले, तर महिला पदाधिकाºयांनी फुगडीचा फेर धरला.हिमाचल प्रदेश मधील व गुजरात मधील विजय हा कार्यकर्ता व विकासावर शिक्का मोर्त असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचावर जनतेचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया खा. धोत्रे यांनी दिली.
गुजरात, हिमाचलमध्ये भाजपला बहुमत : अकोल्यातील भाजपने केला विजयाचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 14:19 IST
अकोला : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता काबीज केल्याबद्दल अकोल्यातील भाजप ने शहरात ठीक ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
गुजरात, हिमाचलमध्ये भाजपला बहुमत : अकोल्यातील भाजपने केला विजयाचा जल्लोष
ठळक मुद्देभाजप कार्यालयासह शहरात विविध ठिकाणी केली कार्यकर्त्यांनी आतषबाजीपेढे, लाडू वाटून साजरा केला विजयाचा आनंद.ढोल, ताशांच्या ठेक्यावर धरला नृत्याचा फेर