अकोला : महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच शुक्रवारी रात्री शहरातील काही भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक २ मधून भारतीय जनता पक्षाचे शरद तूरकर विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण असतांनाच याच प्रभागातील भाजपचेच उमेदवार नितीन राऊत यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी तूरकर यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निकालानंतर राजकीय वादाला तोंड फुटले असून त्याचे पर्यवसान थेट हिंसाचारात झाले.
नितीन राऊत यांच्यासाठी शरद तूरकर यांनी अपेक्षेप्रमाणे मते मागितली नाहीत, त्यामुळेच राऊत यांचा पराभव झाला, असा आरोप करत राऊत यांच्या समर्थकांनी शुक्रवारी रात्री उशिरा तूरकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद तूरकर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेदरम्यान तूरकर यांच्या घराशेजारी उभ्या असलेल्या काही वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्ला आणि तोडफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच अकोट फैल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी राऊत यांच्या समर्थकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचीही माहिती आहे. सध्या परिसरात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. निवडणूक निकालानंतर घडलेल्या या घटनेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पक्षांतर्गत वाद हिंसक वळणावर जाऊ नयेत, यासाठी सर्वांनी संयम बाळगावा, असे आवाहन केले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अकोट फैल पोलीस करत आहेत.
Web Summary : Akola witnessed post-election violence after BJP's Sharad Turkar's victory. He was attacked, allegedly by supporters of a defeated BJP candidate, Nitin Raut. Vehicles were vandalized, and police intervened to control the situation. An investigation is underway.
Web Summary : अकोला में भाजपा के शरद तुरकर की जीत के बाद चुनाव के बाद हिंसा हुई। उन पर कथित तौर पर पराजित भाजपा उम्मीदवार नितिन राऊत के समर्थकों ने हमला किया। वाहनों में तोड़फोड़ की गई, और पुलिस ने स्थिति को नियंत्रित करने के लिए हस्तक्षेप किया। जांच चल रही है।