शेतकरी सुधारणा कायद्याला स्थगिती देणाऱ्या आदेशाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 18:36 IST2020-10-07T18:35:40+5:302020-10-07T18:36:12+5:30

BJP Akola Agitation जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली.

BJP burn the order of postponing the Farmers Reforms Act | शेतकरी सुधारणा कायद्याला स्थगिती देणाऱ्या आदेशाची होळी

शेतकरी सुधारणा कायद्याला स्थगिती देणाऱ्या आदेशाची होळी

अकोला: शेतकरी सुधारणा विधेयकाची स्थगिती देणाºया राज्य शासनाच्या आदेशाची भारतीय जनता पार्टीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलना दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने केलेले कायदे हे महाविकास आघाडी सरकारने स्थगिती करून शेतकºयांना आर्थिक विकासापासून दूर ठेवण्याचे कारस्थान रचले असून, हे सरकार स्थगिती सरकार असल्याची टीका यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: BJP burn the order of postponing the Farmers Reforms Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.