अकोला : शहरात गुन्हेगारी टोळ्यांच्या सावटाखाली राजकीय वर्तुळ हादरले असून बिष्णोई गँगकडून सलग दुसऱ्या आमदाराला खंडणीची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यानंतर आता अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना १० कोटी रुपयांची खंडणी मागणारा धमकीचा फोन आल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास आमदार पठाण यांच्या मोबाईलवर हा कॉल आल्याचे सांगण्यात येते. “दोन दिवसांत १० कोटी रुपये दे, नाहीतर तुझा गेम करू,” अशा शब्दांत धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. हा कॉल बिष्णोई गँगशी संबंधित म्होरक्या शुभम लोणकर याच्याकडून आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे हा कॉल अमेरिकेतील कॅलिफोर्नियावरून आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
सुरक्षा वाढवली; चार शस्त्रधारी तैनात धमकीनंतर तात्काळ आमदार पठाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या संरक्षणासाठी चार शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या निवासस्थानासह हालचालींवरही कडेकोट नजर ठेवली जात आहे. या संदर्भात आमदार पठाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे औपचारिक तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. तपासाबाबत पोलीस आणि आमदार कार्यालयाकडून गोपनीयता पाळली जात आहे.
अकोल्याशी कनेक्शन? बिष्णोई गँगचा कथित संबंध असलेला शुभम लोणकर हा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी बुद्रुक गावचा रहिवासी असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे स्थानिक पातळीवरील धागेदोरे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. गेल्या काही काळात देशभरात बिष्णोई गँगच्या कारवायांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून आता त्याची छाया अकोल्यातही पडल्याचे दिसत आहे. राजकीय व्यक्तींना लक्ष्य करत मोठ्या रकमेची खंडणी मागण्याच्या घटना गंभीर मानल्या जात आहेत.
Web Summary : Akola's political circles are shaken as a second MLA, Sajid Khan Pathan, received a ₹10 crore extortion threat, allegedly from the Bishnoi gang. The call, traced to California, demands payment within two days, prompting increased security for the MLA and a police investigation into local connections.
Web Summary : अकोला के राजनीतिक गलियारों में खलबली, बिश्नोई गिरोह ने दूसरे विधायक साजिद खान पठान को ₹10 करोड़ की रंगदारी की धमकी दी। कैलिफोर्निया से आए कॉल में दो दिन में भुगतान करने की मांग की गई है, जिसके बाद विधायक की सुरक्षा बढ़ाई गई और पुलिस स्थानीय कनेक्शन की जांच कर रही है।