अकोला येथील बोरगावनजीक राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By Atul.jaiswal | Updated: May 9, 2023 12:33 IST2023-05-09T12:33:06+5:302023-05-09T12:33:11+5:30

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संजय खंदाडे यांच्या सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा केला.

Bike rider killed in collision with car on national highway near Borgaon in Akola | अकोला येथील बोरगावनजीक राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अकोला येथील बोरगावनजीक राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अकोला - राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वणी रंभापुर नजीक कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी दरम्यान घडली.  या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. राजु सोनेकर असे मृतकाचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ वणी रंभापुर येथील रात्रीची ड्युटी वरुन राजु रामकृष्ण सोनेकर वय 52 रा वणी रंभापुर ह मुक्काम बोरगाव मंजू हे आपल्या दुचाकी क्रंमाक एम एच 30 बी ओ 1322 वरुन बोरगाव मंजू येथे जात असताना विरूद्ध दिशेने येणाऱ्या कार क्रमांक एम एच 19 सी यू 0297 कार दुचाकी अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार राजु सोनेकर हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संजय खंदाडे यांच्या सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. पुढील तपास ठाणेदार संजय खंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत, वृत्त लिहिस्तोर पोलिस दप्तरी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Bike rider killed in collision with car on national highway near Borgaon in Akola