Big Breaking : अकोल्यात कोरोनाची ‘एन्ट्री’ : पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:36 PM2020-04-07T17:36:27+5:302020-04-07T18:06:52+5:30

एका रुग्णाला कोरोना विषाणूची बाधा झाली असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.

Big Breaking: Corona's 'entry' into Akola: the first positive patient found | Big Breaking : अकोल्यात कोरोनाची ‘एन्ट्री’ : पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

Big Breaking : अकोल्यात कोरोनाची ‘एन्ट्री’ : पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात १२३ संदिग्ध रुग्ण दाखल झाले. ८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने अखेर मंगळवारी अकोल्यातही शिरकाव केला. अकोला जिल्ह्यातील एका रुग्णाला कोरोना विषाणूची बाधा झाली असून, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. सदर इमसाचा अहवाल मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने म्हटले आहे. सदर रुग्ण हा बैदपुरा भागातील असून, या भाग सिल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
एकीकडे राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना, अकोला जिल्ह्यात मात्र आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता. अखेर मंगळवारी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात १२३ संदिग्ध रुग्ण दाखल झाले असून, त्यापैकी ८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अजुनही ३७ अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: Big Breaking: Corona's 'entry' into Akola: the first positive patient found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.